मराठी युवक व्यवसाय करायला का घाबरतात?

     

आपल्याच राज्यात आपण परके होत चाललो आहोत याचे कारण म्हणजे राज्यातील उद्योग हेच राज्याचा कणा असतात व तेच आज परप्रांतीयांच्या हातात आहेत . कुठलाही बिझनेस बघा वरच्या लेव्हलला बाहेरीलच लोक असतात चुकून जरी मराठी माणूस कुठे दिसला तर आपल्याला आश्चर्य वाटते . मराठी माणूस आज उद्योगात मागे पडलाय , महाराष्ट्र राज्य आज फक्त कामगार तयार करते . सध्या बरेच मराठी युवक उद्योग करतात पण यशस्वी होत नाही आणि उद्योग तरी काय , कुठे चहाची टपरी टाक तर कुठे वडापावचा गाडा , हे उद्योग वाईट आहेत असे मी म्हणत नाही पण ह्यांना खरच उद्योग म्हणतात का?

आज तुम्ही कुठल्याही मराठी मुलाला उद्योग टाकण्याविषयी बोललात तर तो तुमची चेष्टा करेल ' पगार घे आणि बस की गप " हा ठरलेला डायलॉग . आज मी मराठी माणूस का उद्योग करत नाही याची कारणे व त्यावरील उपाय थोडक्यात सांगतो

उद्योग ना करण्याची कारणे


आज आपल्याकडे लहानपणा पासूनच शिकवतात की चांगले मार्क घे मग चांगली नोकरी मिळेल ही पहिला अतिशय वरच्या लेव्हलचा मूर्खपणा , युवक नेहमी सेफ झोन मध्ये राहायला बघतात , रिस्क घेत नाहीत , अति राजकारण , फालतू मित्र , ज्यांनी कधी बापजन्मांत धंदा केला नाही त्यांच्याकडून धंद्याविषयी सल्ला घेणे , मार्केटची नीट माहिती न घेणे , आळस , काम टाळणे , धंद्यात दोन शिव्या खायची तयारी लागते फुकट कोण पैसे नाही देत , ग्राहकाला नीट वागणूक न देणे . असा अजून बराच मूर्खपणा मराठी युवा करताना , सगळाच नाही लिहीत आत्ता .

धंदा वाढीसाठी काही महत्त्वाचे सल्ले

सर्वात पहिला जे काम करत आहात त्यामध्ये 100 % काम द्या , पहिल्या 5 वर्षात जास्त फायदा होत नाही त्यामुळे नुकसान सोसायची तयारी ठेवा , धंद्याची पूर्ण माहिती ठेवा , दिलेली वेळ पाळा व आलेला प्रत्येक फोन उचला , कामे टाळू नका , धंद्यातली माहिती असणारे लोक आपल्या आजूबाजूला ठेवा त्याना आपले चांगले मित्र बनवा , 10 ते 5 काम करून कोण मोठा होत नाही त्यासाठी 24 तास राबावे लागते , पैशाचा नीट हिशोब ठेवा व खर्चावर नियंत्रण ठेवा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सगळे चालण्यासाठी ग्राहक आवश्यक आहे म्हणून ग्राहकाची अतिशय विनम्र वागा त्याना कधी आपल्याकडे आल्यावर अपमान वाटू नये असे झाल्यास तो जाताना आपली आणखी 5 ग्राहक घेऊन जातो.

वरील उत्तराने कुणाला वाईट वाटले असेल तर क्षमस्व , धन्यवाद

Comments

Popular posts from this blog

रिजर्व बँक भरपूर नोटा का छापत नाही?

काही अर्थपूर्ण ऐतिहासिक छायाचित्रे कोणती आहेत?