Posts

Showing posts from August, 2020

काही अर्थपूर्ण ऐतिहासिक छायाचित्रे कोणती आहेत?

Image
नथुराम गोडसे [1] Add caption 2. गांधीजी साउथ अफ्रिकेत (1900) [2] 3.भगतसिंग यांचा शेवटचा फ़ोटो (जेलमधे असतांना) 4. झाशीची राणी लक्ष्मीबाई [3] 5. ब्रिटिश राज्यकर्ता आणि त्याचा भारतीय सेवक 6. अंदमान सेलुलर जेलमधील महिला कैदी [4] 7. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच वृत्त 8. अमेरिकेत गोऱ्यांच्या शाळेत जाणारी पहिली कृष्णवर्णीय महिला(1957) 9. आयफेल टॉवेरच रंगकाम(1932) [5] 10. 5 एम् बी ची हार्डड्राइव(1956) [6] 11. स्टॅचु ऑफ़ लिबर्टीच बांधकाम [7] 12. अण्णा हजारे आर्मीत असतांना 13. पहिली भारतीय महिला पायलट सरला ठकराल [8] 14. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची पहिली सकाळ(दिल्ली) 15. टाटा आणि बेंझ कंपनीने संयुक्तरित्या बनवलेला ट्रक [9] 16. ब्रिटिश काळातील एक फळांच दूकान 17. भारत पाकिस्तान फाळणी 18. जवाहरलाल नेहरू भारतातील पहिला संगणक बघतांना [10] 19. एयर इंडिया मधील एक हवाई सुंदरी [11] 20. लोकमान्य टिळक यांच्यावर अंत्यसंस्कार करतांना धन्यवाद! संध्या 🌸 तळटीपा

रिजर्व बँक भरपूर नोटा का छापत नाही?

Image
            व्हेनेझुएला' जगात तेलनिर्मिती मध्ये सर्वात अग्रेसर असा हा देश आज भिकेला लागला आहे. या दिवाळखोरीमागे अनेक कारणे आहेत आणि जास्तीत जास्त चलनी नोटा छापून बाजारात उतरवणं त्यातील एक प्रमुख कारण. जास्तीत जास्त नोटा छापून जनतेत वितरित केल्या आणि त्यांना खर्च करायला सांगितलं तर अर्थव्यवस्था जोमात येईल असा विचार राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनी केला पण झालं उलटंच. व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था पार कोमात जाऊन मृत्युशय्येवर पोहोचली आहे. असं नोटा छापून अर्थव्यवस्था रुळावर येत नाही तर चलन फुगवटा होऊन उरली सुरली अर्थव्यवस्था डबघाईला जाते.                झिम्बाब्वे, सोमालिया हे देश सुद्धा अशाच प्रकारे चलन फुगवट्यामुळे बरबाद झाले. हे चित्र सोमालिया मधील आहे. या ट्रॉलीमधील नोटांच्या ५-६ गड्ड्या देऊन हा माणूस जास्तीत जास्त एक पाण्याची बाटली खरेदी करू शकतो. इतक्या प्रमाणात या नोटांचे अवमूल्यन झाले होते. झिम्बाब्वे या देशात नोटा छपाईचा जो धडाका सुरु झाला त्यामुळे तिथे  २३ कोटी १० लाख टक्क्यांनी  चलनाचे अवमूल्यन झाले होते....

रशिया बद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

Image
  रशीया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. १९९१ च्या पूर्वी सोवियेत रशिया या नावाचा एक प्रचंड देश होता. १९९१ मध्ये सोवियेत रशियाचे विभाजन होऊन १५ नवे देश निर्माण झाले. तरीही रशिया हाच सर्वात मोठा देश राहिला. या देशांमध्ये आजचा रशिया, मध्य आशियातील कझाकस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिझस्तान तर पूर्व युरोपातील युक्रेन, बेलारूस, माल्डोवा, युरोपातील बाल्टिक प्रदेशातील लॅटविया, एस्टोनिया, लिथुआनिया तर कॉकेशस खोऱ्यातील अझरबैजान, आर्मीनिया आणि जॉर्जिया यांचा समावेश आहे. आजचा रशियाच एवढा प्रचंड आहे तर सोव्हिएत रशिया केवढा असेल याची आपण कल्पना करू शकतो. अमेरिकेतील १५ लक्ष वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाचे सर्वात मोठे संस्थान अलास्का हे १८६० पूर्वी रशियाच्या ताब्यात होते. ते रशियाने १८६७ साली ७२ लक्ष डॉलर्स मध्ये अमेरिकेला विकले. याचा अर्थ रशिया हा आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका या तीनही खंडांत पसरला होता. आज अफगाणिस्तानची सीमा ताजिकिस्तानला स्पर्श करते. अफगाणिस्तानच्या या भागाला वखान कॉरिडॉर असे नाव आहे. तेव्हा ब्रिटिश आणि रशियन सरकारने करार केला की या दोन देशांच्या सीमा लागून न...

वाघ समोर आल्यावर काय करावे?

Image
                 तु मचा सामना समोरासमोर वाघाशी झालाच तर तुमच्याकडे स्वत:च्या बचावासाठी बरेच काही करण्यासारखे असते. सामान्यपणे वाघ आपल्यापेक्षा लहान दिसणार्‍या जिवांवरच हल्ला करतो. त्यामुळे वाघ समोर आल्यास चुकूनही खाली बसू नका! वाघ समोर आल्यास मनुष्य घाबरून पळू लागतो. आणि वाघाची इच्छा नसतानाही त्याच्यातील शिकारी वृत्ती जागी होऊन तो तुमच्यावर झडप घालू शकतो. तुम्ही कितीही वेगाने पळ काढला तरी काही क्षणातच तो तुम्हाला गाठू शकतो. विशेष म्हणजे कुठलाही वाघ आपल्या शिकारीवर पाठीमागूनच हल्ला करतो. त्यामुळे वाघाशी सामना झाल्यावर पाठ दाखवून पळणे म्हणजे स्वत:ला मृत्यूच्या दारी झोकून देण्यासारखेच असते. जंगलात फिरताना मुखवट्याचा वापर करणे खूपच हिताचे ठरते. मुखवट्यामुळे वाघ संभ्रमात पडतो आणि तो कितीही भुकेला असला तरी दोन चेहरे पाहून वाघ तुमच्यावर हल्ला करण्याचे टाळतो. वाघ अगदी पुढ्यात येऊन ठेपल्यास दोन्ही हात लांब सोडा आणि ताठ मानेने उभे राहा. यामुळे वाघाला तुम्ही खूप बलवान असल्याची जाणीव होईल. अशावेळी वाघांच्या हालचाली ध्यानात घ्या. वाघ सारखा आपले शेपूट जमिन...

या डिजिटल युगात अजूनही काही न उमगलेले ही रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

Image
  केनियाच्या रुडोल्फ लेकजवळ असलेल्या या आयलंड 'नो रिटर्न' आयलंड म्हणतात. आता या आयलंडवर कुणी राहत नाही. असे म्हटले जाते की, अनेक वर्षांपूर्वी इथे लोक राहत होते, पण एक दिवस ते सगळे अचानक गायब झाले. त्यांची माहिती आजपर्यंत मिळू शकली नाही. असंही म्हणतात की, आजही कुणी या आयलंडवर गेलं तर परत येत नाही. मानव आज चंद्रावर पोहचला,मंगळावर पोहचला एवढंच नव्हे तर अवकाशात जाऊन इतर ग्रहांचा पण शोध घ्यायला लागला, परंतु आजही मानवाच्या आजूबाजूला काही गूढ गोष्टी आहेत जे आज पर्यंत एक न उकघडलेलं कोडं बनलं आहे व्यक्तीचं नाव ली चिंग युएन आहे. यांच्याबाबत म्हटलं जातं की, हे २५६ वर्षे जिवंत होते. चीनला राहणारे ली चिंग हे औषधांचे मोठे जाणकार होते आणि यासाठी त्यांना वयाच्या १०० व्या वर्षी सरकारकडून बक्षीसही देण्यात आलं होतं. असे म्हणतात की, २०० वय झाल्यावरही ते विश्वविद्यालयात लेक्चर देण्यासाठी जात होते. तसेच त्यांनी २४ लग्ने केली होती. पण त्यांचं हे वय आजही रहस्य बनून आहे. “जैक दि रिपर” हे नाव तुम्ही बऱ्याच चित्रपटात,नाटकात,मालिकामध्ये तुम्ही ऐकलं असेल,बघितलं असेल. १८ व्या शतकातील ह्या कुख्यात हत्याऱ्यान...

हा फरक असतो CIB आणि राज्य पोलीस तपासणीत !

Image
सीबीआय चा तपास आणि राज्य पोलिसांचा तपास ह्या मध्ये कोणताही फरक नसतो,(फक्त सीबीआय चे विशेष न्यायालय असतात) कारण सीबीआय ही एक तपास यंत्रणा आहे, आणि ती सम्पूर्ण ह्या देशातील फौजदारी कार्य संहिता 1973 ( क्रिमिनल प्रोसिजर कोड CRPC) नुसारच कार्य करते,, त्यांचे कायदे हे भारतीय मुख्य कायदे ,किरकोळ केंद्रीय कायदे, आणि काही विशेष कायदे यांची अंमलबजावणी करतात,, त्यांच्या तपासाची व्याप्ती सम्पूर्ण देशभर असते, सीबीआय मधील तपास अधिकारी हे भारतीय पोलीस सेवा(IPS)मधील वेगवेगळ्या राज्यातील असतात, त्यांना प्रतिनियुक्तीवर सीबीआय ला नियुक्त केले जातात, तसेच राज पोलीस दलातील वर्ग एक ,(Class 1) ह्यांना पण प्रतिनियुक्तीवर घेतले जाते, पोलीस निरीक्षक व त्या वरील पदावरील अधिकारी, दरवर्षी सीबीआय कडून राज्य सरकार कडे राज्य पोलीस दलाकडे प्रतिनियुक्तीवर अधिकारी जानेस इच्छुक आहे का याबाबत विचारणा होत असते,, म्हणजे भारतीय पोलीस सेवा, आणि राज्य पोलीस सेवा ह्या मधीलच अधिकारी असतात,, सीबीआय आणि राज्य पोलीस दल हे CRPC च्या तरतुदी अंतर्गत तपास करतात,, सीबीआय चे विशेष कोर्ट असतात, परंतु त्यांना सुद्धा त्यांचे अधिकार CRPC का...

जाणून घेऊ अनैसर्गिक संबंध आहे तरी काय?

Image
  अनैसर्गिक संभोग म्हणजे ज्या संभोगातून प्रजनन होणार नाही. संभोग केवळ प्रजननासाठी केला पाहिजे या धारणेमुळे या कायद्याचा फटका गे अर्थातच समलैंगिक पुरुष, लेस्बियन अर्थात समलैंगिक स्त्रिया, बायसेक्शुअल म्हणजे उभयलिंगी पुरुष आणि स्त्रिया आणि ट्रान्सजेंडर्स यांना बसला . भारतीय दंड संहितेचे कलम ३७७  नुसार  निसर्गाच्या विरुद्ध (Against the order of nature)  केलेला संभोग हा अनैसर्गिक मानला जातो.  निसर्गाच्या विरुद्ध म्हणजे? तर साधारणपणे असे मानले जाते की ज्या संभोग क्रियेतून संतान प्राप्ती होत नाही ते सेक्स म्हणजे अनैसर्गिक. १) सहमतीने किंवा असहमतीने प्रस्थापित केलेले  समलैंगिक संबंध. २) असहमतीने प्रस्थापित केलेले संबंध म्हणजे  बलात्कार . ३)  अल्पवयीनशी  (१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींशी) प्रस्थापित केलेले संबंध. ४)  प्राण्यांशी  प्रस्थापित केलेले संबंध. ज्याला इंग्रजीमधे  bastility  असे म्हणतात. परंतु  ६ सप्टेंबर २०१८  मध्ये झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानुसार दोन प्रौढांमधील संमतीने केलेल्या स...

लहान मुले नवीन खेळणी लवकरच का तोडून फोडून टाकतात?

Image
  लहान मुलं खेळणी का तोडतात याचे उत्तर शक्तीचा सिद्धांत (Theory of power) मध्ये मिळते. मुलांना जेव्हा हतबल, शक्तीहीन आणि लहान वाटतं तेव्हा ते मोठ्या माणसांसारखे वागण्याचा प्रयत्न करतात. सतत हे करु नको ते करु नको हे ऐकून मुलं कंटाळतात आणि मग खेळणी तोंडुन त्यांना थोडं शक्तिशाली झाल्याचं समाधान मिळतं. लहान मुलं खेळणी का तोडतात याचे चार प्रमुख कारणे आहेत- महत्त्वाचे कारण शक्तिशाली असल्याचा अनुभव घेणे उत्सुकता - की हे खेळणं कसं चालतं, मग हे जाणून घेण्याच्या नादात खेळणी तुटतात अजाणतेपणी खेळण्यावर चुकीच्या ठिकाणी दाब दिल्यास खेळणी तुटतात. जर पालक मुलांना हिंसक वागणूक देत असतील किंवा मुले सतत हिंसक दृश्य पहात असतील तर ते खेळणी तोडतात.

मराठी युवक व्यवसाय करायला का घाबरतात?

Image
       आपल्याच राज्यात आपण परके होत चाललो आहोत याचे कारण म्हणजे राज्यातील उद्योग हेच राज्याचा कणा असतात व तेच आज परप्रांतीयांच्या हातात आहेत . कुठलाही बिझनेस बघा वरच्या लेव्हलला बाहेरीलच लोक असतात चुकून जरी मराठी माणूस कुठे दिसला तर आपल्याला आश्चर्य वाटते . मराठी माणूस आज उद्योगात मागे पडलाय , महाराष्ट्र राज्य आज फक्त कामगार तयार करते . सध्या बरेच मराठी युवक उद्योग करतात पण यशस्वी होत नाही आणि उद्योग तरी काय , कुठे चहाची टपरी टाक तर कुठे वडापावचा गाडा , हे उद्योग वाईट आहेत असे मी म्हणत नाही पण ह्यांना खरच उद्योग म्हणतात का? आज तुम्ही कुठल्याही मराठी मुलाला उद्योग टाकण्याविषयी बोललात तर तो तुमची चेष्टा करेल ' पगार घे आणि बस की गप " हा ठरलेला डायलॉग . आज मी मराठी माणूस का उद्योग करत नाही याची कारणे व त्यावरील उपाय थोडक्यात सांगतो उद्योग ना करण्याची कारणे आज आपल्याकडे लहानपणा पासूनच शिकवतात की चांगले मार्क घे मग चांगली नोकरी मिळेल ही पहिला अतिशय वरच्या लेव्हलचा मूर्खपणा , युवक नेहमी सेफ झोन मध्ये राहायला बघतात , रिस्क घेत नाहीत , अति राजकारण , फालतू मित्र , ज्यांनी कधी ...

भिकारी जर मुलांना सांभाळू शकत नसतील तर जन्म तरी का देतात?

Image
भिकारी जर मुलांना सांभाळू शकत नसले तरी त्यांना जन्म देतात   याची विविध कारणे खालीलप्रमाणे : लैंगिक गरज :  भिक्षेकरीकडे जरी प्राथमिक गरजा अन्न-वस्त्र-निवारा नसल्या तरी ते एक सामान्य मनुष्यच असतात. त्यामुळे त्यांना देखील इंद्रिय तृप्तीसाठी लैगिक गरजा असतात. शिवाय इंद्रियांवर ताबा मोठमोठ्या तपस्वीनां करता आला नाही तर फक्त खिसा रिकामा असलेल्या दीनांना काय करता येईल ? अन म्हणूनच आपली लैंगिक गरज पूर्ण केल्यावर नवीन अपत्य जन्माला घालतात. आयुष्यभर लैंगिक गरज टिकत असल्यामुळे नकळत अनेक अपत्यांना ते जन्म देतात. अनेक अपत्यांचा आजारात उपचाराभावी मृत्यु ही होतो त्यामुळे बऱ्याचदा संतुलन बनून राहते. निरोधकांचा अभाव :  खिसा रिकामा असल्यामुळे साहजिकच ते लैंगिक गरज भागवण्यासाठी निरोधक वापरणे टाळतात. पैसे जरी असले तरी निरोधकांना ते दुय्यम मानतात. शिवाय निरोधकांबद्दल असणारे अज्ञान अथवा गैरसमज त्यांना यासाठी मोठी समस्या बनते. कुटुंब नियोजनाबद्दल अज्ञान :  अशिक्षित व समाज ज्ञानापासून अनभिज्ञ असल्यामुळे त्यांना कुटुंब नियोजन माहीत नसते. शिवाय वैद्यकीय उपचारांचा खर्च अवडज असल्यामुळे ते ...