भिकारी जर मुलांना सांभाळू शकत नसतील तर जन्म तरी का देतात?
भिकारी जर मुलांना सांभाळू शकत नसले तरी त्यांना जन्म देतात याची विविध कारणे खालीलप्रमाणे :
- लैंगिक गरज : भिक्षेकरीकडे जरी प्राथमिक गरजा अन्न-वस्त्र-निवारा नसल्या तरी ते एक सामान्य मनुष्यच असतात. त्यामुळे त्यांना देखील इंद्रिय तृप्तीसाठी लैगिक गरजा असतात. शिवाय इंद्रियांवर ताबा मोठमोठ्या तपस्वीनां करता आला नाही तर फक्त खिसा रिकामा असलेल्या दीनांना काय करता येईल ? अन म्हणूनच आपली लैंगिक गरज पूर्ण केल्यावर नवीन अपत्य जन्माला घालतात. आयुष्यभर लैंगिक गरज टिकत असल्यामुळे नकळत अनेक अपत्यांना ते जन्म देतात. अनेक अपत्यांचा आजारात उपचाराभावी मृत्यु ही होतो त्यामुळे बऱ्याचदा संतुलन बनून राहते.
- निरोधकांचा अभाव : खिसा रिकामा असल्यामुळे साहजिकच ते लैंगिक गरज भागवण्यासाठी निरोधक वापरणे टाळतात. पैसे जरी असले तरी निरोधकांना ते दुय्यम मानतात. शिवाय निरोधकांबद्दल असणारे अज्ञान अथवा गैरसमज त्यांना यासाठी मोठी समस्या बनते.
- कुटुंब नियोजनाबद्दल अज्ञान : अशिक्षित व समाज ज्ञानापासून अनभिज्ञ असल्यामुळे त्यांना कुटुंब नियोजन माहीत नसते. शिवाय वैद्यकीय उपचारांचा खर्च अवडज असल्यामुळे ते कुटुंब नियोजनास दुय्यम मानतात.
- अपत्यांद्वारे स्वतःचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी - लोकं लहान मुलं बघितल्यावर भावुक होतात अन लगेच खिश्यात हात टाकून पैसे देऊन मोकळे होतात. मोठ्यांच्या मानाने लहान मुलांना चटकन भिक्षा मिळते व जास्त मिळत असल्यामुळे बरेच भिक्षेकरी वर्ग अधिकाधिक अपत्यांना जन्म घालतात.
- वंशदिपाचा मोह : कितीही असले तरी त्यांना देखील स्वतःचा वंश टिकावा असे वाटते. त्यांना देखील स्वतःची जात, समाज, पूर्वजे माहीत असतात. त्यामुळे आपल्यासारखाच स्वतःच्या वंशाचा विचार त्यांच्या मनात देखील फोफावतो.
आपण काय करू शकतो :
- रस्त्यावर जर लहान मुलं भिक्षा मागतांना दिसत असतील तर कृपया त्यांच्या हातात मुळीच पैसे देऊ नका. आपल्या वाहनात थोडेफार बिस्किटे अथवा खाउ शिल्लक ठेवा. अशी भिक्षेकरी मुलं दिसल्यावर त्यांना पैश्यांऐवजी खाऊ द्या.
- आपल्याला शक्य असेल तर आयुष्यात एका तर भिक्षेकरी मुलाचा शैक्षणिक खर्च दत्तक घ्या. उच्च शिक्षण दिले नाही तरी किमान दहावीपर्यंत शिकला तरी खूप मोठा आधार समाजाला होईल.
- अनेक तरुण मंडळी स्वतःहून अश्या मुलांना पैसे देऊन स्वतः शिकवतात. एखाद्या शेडखाली अश्या मुलांची रोज एक तासाची शाळा आपण घेतली तरी खूप बदल जाणवेल. (काही वर्षांपूर्वी पुण्यातील झेडब्रिज खाली रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी अशीच एक मोहीम राबवली होती.)
- आपण जर व्यावसायिक असाल तर अश्या भिक्षेकरी मुलांच्या पालकांना भेटून त्यांच्या पालकांना कमीत कमी काम मिळवून द्या.(बऱ्याच भिक्षेकरी लोकांना आयतखाऊपणा असल्यामुळे काम करणे ते टाळतात, मात्र त्यांचा स्वाभिमान जागवला तर शेळी सुद्धा वाघ होते.)
उर्वरित आपणाला जे योग्य व आवश्यक वाटेल तो मार्ग निवडावा. फक्त उपेक्षा केल्याने बदल घडणार नाही जोपर्यंत कुणीतरी त्यासाठी लढणार नाही.
Comments
Post a Comment