या डिजिटल युगात अजूनही काही न उमगलेले ही रहस्य तुम्हाला माहिती आहे का?
केनियाच्या रुडोल्फ लेकजवळ असलेल्या या आयलंड 'नो रिटर्न' आयलंड म्हणतात. आता या आयलंडवर कुणी राहत नाही. असे म्हटले जाते की, अनेक वर्षांपूर्वी इथे लोक राहत होते, पण एक दिवस ते सगळे अचानक गायब झाले. त्यांची माहिती आजपर्यंत मिळू शकली नाही. असंही म्हणतात की, आजही कुणी या आयलंडवर गेलं तर परत येत नाही.
मानव आज चंद्रावर पोहचला,मंगळावर पोहचला एवढंच नव्हे तर अवकाशात जाऊन इतर ग्रहांचा पण शोध घ्यायला लागला, परंतु आजही मानवाच्या आजूबाजूला काही गूढ गोष्टी आहेत जे आज पर्यंत एक न उकघडलेलं कोडं बनलं आहे
व्यक्तीचं नाव ली चिंग युएन आहे. यांच्याबाबत म्हटलं जातं की, हे २५६ वर्षे जिवंत होते. चीनला राहणारे ली चिंग हे औषधांचे मोठे जाणकार होते आणि यासाठी त्यांना वयाच्या १०० व्या वर्षी सरकारकडून बक्षीसही देण्यात आलं होतं. असे म्हणतात की, २०० वय झाल्यावरही ते विश्वविद्यालयात लेक्चर देण्यासाठी जात होते. तसेच त्यांनी २४ लग्ने केली होती. पण त्यांचं हे वय आजही रहस्य बनून आहे.
“जैक दि रिपर” हे नाव तुम्ही बऱ्याच चित्रपटात,नाटकात,मालिकामध्ये तुम्ही ऐकलं असेल,बघितलं असेल. १८ व्या शतकातील ह्या कुख्यात हत्याऱ्याने लंडनच्या पूर्वी भागात ११ महिलांना निर्दयीपणे मारलं होत. ज्यांना मारलं त्या सर्व त्यावेळच्या वैश्याव्यवसाय करणाऱ्या होत्या.हा हत्यारा त्यांचे अश्या प्रकारे तुकडे करायचा की त्यांना कुणीही ओळखू शकत नव्हते.पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की,त्याला कधीच कुणी बघितलं नाही आणि पकडण्यातही आलं नाही.
ताओस हम्म न्यू मेक्सिको मधील हे सुंदर व छोटस असणार शहर “ताओस” मुळे चांगलंच प्रसिद्ध आहे.या शहराच्या बाहेर डिझेल इंजिन च्या चालण्याचा आवाज ऐकायला येतो,हा आवाज सर्वांना स्पष्टपणे ऐकायला येतो,पण कुठलेही यंत्र आवाज कुठून येतो याचा शोध घेऊ शकले नाही.या आवाजाला “ताओस हम्म” असे म्हणतात.
बरमुडा ट्रँगल नावाने ओळखला जाणारा हा भाग बरमुडा,मियामी आणि पोर्तो रिको दरम्यान येतो. या भागातून जाणारे पायलट सांगतात की,येथून बरेच विमान गायब झालेत,त्याच बरोबरच बरेच जहाज सुद्धा समुद्रामध्ये गायब झालेत. बरेच लोक समजतात की हे सर्व एलियन किंवा गॅस प्रेशर मुळे होते,पण यामागील नेमकं कारण अजूनही कुणालाच सापडलं नाही.
शेफर्ड वास्तूवरील लिखाण इंग्लंडमधील स्टेफोर्डशायर मध्ये एक मूर्ती आहे त्यावर केलेले लिखाण आजपर्यंत सर्वात हुशार माणसाला सुद्धा समजले नाही. ही वास्तू १८ व्या शतकामध्ये बनवण्यात आली आणि इथे सापडणाऱ्या चिठ्ठ्या २५० वर्षानंतर सुद्धा कुणालाही वाचता येत नाहीत.
या दगडांचा शोध जवळपास १९३० मध्ये लावला होता. १६ टन वजनी या दगडांना हाताने तयार केलं होतं. सर्वात छोट्या दगडाची आकृती एखाद्या टेनिस बॉलसारखी आहे. घनदाट जंगलात अशाप्रकारची आकृती तयार करणे जवळपास अशक्य आहे. हे दगड कुणी तयार केले, का केले? हे आजपर्यंत एक रहस्यच आहे.
तस बघितलं तर स्टोनहेंज पाहायला खूप छान आहे,पण आजही कुणालाच माहिती नाही की हे एकमेकांना दगड कसे लावले व यामागील उद्देश काय होता.
अमेरिकेतील प्रति स्टोनएज म्हणून ओळखला जाणारा एलबर्ट काउंटी मध्ये असलेला गाईडस्टोन च्या आजूबाजूला बऱ्याच गूढ कथा गुंतलेल्या आहेत,हे १९७९ मध्ये बनवलं गेलं आहे.या भिंतीवर इंग्रजी, हिंदी,स्वाहिली,हिब्रू,अरबी,चायनीज,रशियन आणि स्पॅनिश भाषेत लिहलं आहे,पाम आजपर्यंत कुणालाही नाही समजलं की हे कशासाठी आणि का इथे लिहलं आहे.
एक असा कापड ज्यावर एका माणसाच्या चेहऱ्याची कलाकृती आहे,आणि हे आजच्या वैज्ञानिकांना शोधण्यासाठी आव्हान बनले आहे.बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की,हा चेहरा नाजरेथ च्या ईसा मासिहा असू शकते पन हा अंदाजा आहे।
दि लोक नेस मॉनस्टर याच्या विषयीसुद्धा बऱ्याच रहस्यमयी गोष्टी प्रचलित आहेत,काही लोकं म्हणतात की हा एक समुद्री जीव आहे.याचे कितीतरी फोटो आणि विडिओ बनलेले आहेत,ते बघून कुणी म्हणत की हा समुद्री साप किंवा डायनासोर असेल.याला कधी पाण्याच्या वर तर कधी पाण्याच्या आत बघितलं असे लोक म्हणतात.पन ते नेमकं काय आहे हे अजून कुणालाही माहिती नाही.
याला लोक सांस्क्वेच नावाने सुद्धा ओळखतात.लोकांच्या म्हणण्यानुसार बिगफूट हा युनायटेड स्टेट आणि कॅनडा च्या हिमाच्छादित भागात आढळला जातो.याला जर बघितलं तर हा सुरून गोरिला आहे असं वाटत,तर याच्या चालण्याच्या पद्धतीवरून लोक याला मानव आहे असं म्हणतात,पण हा प्राणी नेमका कोणता आहे हे कुणालाही माहिती नाही.
📍स्रोत:गूगल
Comments
Post a Comment