जाणून घेऊ अनैसर्गिक संबंध आहे तरी काय?

 


अनैसर्गिक संभोग म्हणजे ज्या संभोगातून प्रजनन होणार नाही. संभोग केवळ प्रजननासाठी केला पाहिजे या धारणेमुळे या कायद्याचा फटका गे अर्थातच समलैंगिक पुरुष, लेस्बियन अर्थात समलैंगिक स्त्रिया, बायसेक्शुअल म्हणजे उभयलिंगी पुरुष आणि स्त्रिया आणि ट्रान्सजेंडर्स यांना बसला.

भारतीय दंड संहितेचे कलम ३७७  नुसार निसर्गाच्या विरुद्ध (Against the order of nature) केलेला संभोग हा अनैसर्गिक मानला जातो.

 निसर्गाच्या विरुद्ध म्हणजे? तर साधारणपणे असे मानले जाते की ज्या संभोग क्रियेतून संतान प्राप्ती होत नाही ते सेक्स म्हणजे अनैसर्गिक.

१) सहमतीने किंवा असहमतीने प्रस्थापित केलेले समलैंगिक संबंध.

२) असहमतीने प्रस्थापित केलेले संबंध म्हणजे बलात्कार.

३) अल्पवयीनशी (१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींशी) प्रस्थापित केलेले संबंध.

४) प्राण्यांशी प्रस्थापित केलेले संबंध. ज्याला इंग्रजीमधे bastility असे म्हणतात.

परंतु ६ सप्टेंबर २०१८ मध्ये झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानुसार दोन प्रौढांमधील संमतीने केलेल्या समलैंगिक संभोगांसाठी कलम ३७७ घटनाबाह्य घोषित केले.

आता आपण निरीक्षण केले तर असे लक्षात येईल की हे कलम निसर्गाच्या विरुद्ध ( Against the order of nature ) ह्या शब्दांवर भर देते. त्यानुसार असा तर्क लावला जावू शकतो की निसर्गाने मनुष्याला मुख हे अन्न ग्रहण करण्यासाठी तर गुदद्वार हे मल त्याग करण्यासाठी दिले आहे. तरीही बरेच लोक मुख आणि गुदद्वाराचा उपयोग अनुक्रमे oral आणि anal सेक्स साठी करतात. मग ह्यानुसार हे पण अनैसर्गिक झाले! 

Comments

Popular posts from this blog

रिजर्व बँक भरपूर नोटा का छापत नाही?

काही अर्थपूर्ण ऐतिहासिक छायाचित्रे कोणती आहेत?

मराठी युवक व्यवसाय करायला का घाबरतात?