रशिया बद्दल तुम्हाला हे माहित आहे का?
- रशीया हा जगातील सर्वात मोठा देश आहे.
- १९९१ च्या पूर्वी सोवियेत रशिया या नावाचा एक प्रचंड देश होता. १९९१ मध्ये सोवियेत रशियाचे विभाजन होऊन १५ नवे देश निर्माण झाले. तरीही रशिया हाच सर्वात मोठा देश राहिला.
- या देशांमध्ये आजचा रशिया, मध्य आशियातील कझाकस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिझस्तान तर पूर्व युरोपातील युक्रेन, बेलारूस, माल्डोवा, युरोपातील बाल्टिक प्रदेशातील लॅटविया, एस्टोनिया, लिथुआनिया तर कॉकेशस खोऱ्यातील अझरबैजान, आर्मीनिया आणि जॉर्जिया यांचा समावेश आहे.
- आजचा रशियाच एवढा प्रचंड आहे तर सोव्हिएत रशिया केवढा असेल याची आपण कल्पना करू शकतो.
- अमेरिकेतील १५ लक्ष वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाचे सर्वात मोठे संस्थान अलास्का हे १८६० पूर्वी रशियाच्या ताब्यात होते. ते रशियाने १८६७ साली ७२ लक्ष डॉलर्स मध्ये अमेरिकेला विकले.
- याचा अर्थ रशिया हा आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका या तीनही खंडांत पसरला होता.
- आज अफगाणिस्तानची सीमा ताजिकिस्तानला स्पर्श करते. अफगाणिस्तानच्या या भागाला वखान कॉरिडॉर असे नाव आहे. तेव्हा ब्रिटिश आणि रशियन सरकारने करार केला की या दोन देशांच्या सीमा लागून नसाव्यात. (भारत - पाकिस्तान हे ब्रिटिशांकडे होते तर ताजिकिस्तान हा रशियाकडे होता). त्यामुळे १८९३ साली ब्रिटिशांनी ही अरुंद पट्टी अफगाणिस्तानला देऊन रशियाला वेगळे केले. तत्पूर्वी भारत व रशिया यांच्या सीमा लागून होत्या. आज मात्र त्यांच्यात १८०० ते २००० किलोमीटर अंतर आहे.
- सोवियेत रशिया असेपर्यंत अवकाशात त्याने बरीच मजल मारली होती. अमेरिकेला तेवढा एकच प्रतिस्पर्धी होता.
- सर्वात पहिला अवकाशवीर युरी गागारीन हा रशियनच होता. त्याने १९६१ साली हा मान मिळवला.
- एवढा प्रचंड असूनही रशियात फक्त साडेचौदा कोटी लोक राहतात.
- त्यातील बहुतांश लोक पश्चिमेकडील म्हणजेच युरोपियन रशियात राहतात.
- रशियाचा पूर्व पश्चिम विस्तार इतका मोठा आहे की रशियात अकरा टाईम झोन्स आहेत ! भारतात मात्र फक्त एकच आहे.
- ग्रीनविच अधिक दोन तास ते ग्रीनविच अधिक बारा तास इतके हे झोन्स आहेत.
- रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे हा जगातील तिसरा सर्वात लांब रेल्वेमार्ग आहे. हा रशियाची राजधानी मॉस्को पासून व्लाडिवोस्टोक पर्यंत जातो. याची लांबी ९००० किलोमीटर पेक्षा अधिक आहे.
- पहिले दोन रेल्वेमार्ग सुद्धा रशियातूनच जातात. फक्त ते पूर्णपणे रशियात नसून एखाद्या दुसऱ्या देशात जातात. मात्र त्यांचा बहुतांश मार्ग रशियातच आहे. त्यातील जगातील सर्वात लांब लोहमार्ग म्हणजे मॉस्को ते प्योंगयांग (उत्तर कोरिया) हा होय. तर दुसरा कियेफ (यूक्रेन) ते व्लाडिवोस्टोक हा होय.
- रशियाचे हवामान शीत असते. अति उत्तरेकडील आर्क्टिक महासागराजवळील भागात तर ते अतिशीत असते. हा प्रदेश टुंड्रा, तैगा इत्यादी प्रकारात मोडतो.
- रशियात व्होल्गा, ओब-इर्तिश, येनिसी, लेना इत्यादी मोठ्या नद्या आहेत. यापैकी व्होल्गा नदी कॅस्पियन समुद्राला तर इतर तीन आर्क्टिक महासागराला मिळतात.
- रशियात बैकल नावाचे एक सरोवर आहे. हे जगातील सर्वात खोल सरोवर होय.
- पूर्वी रशियात अरल समुद्र नावाचे एक सरोवर होते. रशियाने या समुद्राला येऊन मिळणाऱ्या नद्यांचे प्रवाह बदलले. त्यामुळे अरल समुद्र दिवसेंदिवस आटू लागला. आता त्याचा फारच थोडा भाग शिल्लक आहे. ही या शतकातील सर्वात वाईट आपत्तींपैकी एक समजली जाते.
- रशियातील तुंगस्का येथे १९०८ साली एक भयानक स्फोट झाला. त्याने कित्येक वर्ग किलोमीटर क्षेत्रातील अरण्य भुईसपाट करून टाकले. तिथे नक्की काय घडले याबद्दल अजूनही निश्चित माहिती उपलब्ध नाही.
- स्रोत : गुगल

Comments
Post a Comment