हा फरक असतो CIB आणि राज्य पोलीस तपासणीत !
सीबीआय चा तपास आणि राज्य पोलिसांचा तपास ह्या मध्ये कोणताही फरक नसतो,(फक्त सीबीआय चे विशेष न्यायालय असतात) कारण सीबीआय ही एक तपास यंत्रणा आहे, आणि ती सम्पूर्ण ह्या देशातील फौजदारी कार्य संहिता 1973 ( क्रिमिनल प्रोसिजर कोड CRPC) नुसारच कार्य करते,, त्यांचे कायदे हे भारतीय मुख्य कायदे ,किरकोळ केंद्रीय कायदे, आणि काही विशेष कायदे यांची अंमलबजावणी करतात,, त्यांच्या तपासाची व्याप्ती सम्पूर्ण देशभर असते, सीबीआय मधील तपास अधिकारी हे भारतीय पोलीस सेवा(IPS)मधील वेगवेगळ्या राज्यातील असतात, त्यांना प्रतिनियुक्तीवर सीबीआय ला नियुक्त केले जातात, तसेच राज पोलीस दलातील वर्ग एक ,(Class 1) ह्यांना पण प्रतिनियुक्तीवर घेतले जाते, पोलीस निरीक्षक व त्या वरील पदावरील अधिकारी, दरवर्षी सीबीआय कडून राज्य सरकार कडे राज्य पोलीस दलाकडे प्रतिनियुक्तीवर अधिकारी जानेस इच्छुक आहे का याबाबत विचारणा होत असते,, म्हणजे भारतीय पोलीस सेवा, आणि राज्य पोलीस सेवा ह्या मधीलच अधिकारी असतात,, सीबीआय आणि राज्य पोलीस दल हे CRPC च्या तरतुदी अंतर्गत तपास करतात,, सीबीआय चे विशेष कोर्ट असतात, परंतु त्यांना सुद्धा त्यांचे अधिकार CRPC कायद्याला धरूनच असतात,,सीबीआय क्रिमिनल प्रोसिजर कोड, इंडियन एव्हीडेन्स ऍक्ट, इंडियन पिनल कोड, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट , हे सर्व कायदे वापरतात,,आणि हे सर्व मुख्य कायदे सर्व राज्यांना लागू आहेत,

Comments
Post a Comment